Aamir Khan Son Junaid Khan Film| अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खानने देखील अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. मागील अनेक दिवसांपासून जुनैद खानच्या बॉलिवूड डेब्यूची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. यातच जुनैद खान ‘महाराज’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘महाराज’ या सिनेमातून जुनैद अभिनयात पाऊल ठेवत आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला हा सिनेमा अखेर पुढील महिन्यात रिलीज होणार आहे.
जुनैद खान पत्रकाराच्या भूमिकेत
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 14 जून 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज होणार आहे. या चित्रपटात जुनैदसह जयदीप अहलावत, शालिनी पांडे आणि शर्वरी वाघ यांच्याही भूमिका आहेत. यात जुनैद खान पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे.
‘महाराज’ सिनेमातून 1862 सालातील महाराज लिबेल केसची गोष्ट मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. महिला अनुयायांशी अनैतिक संबंध ठेवल्याचा ठपका लावल्याबद्दल एका धार्मिक नेत्याने वृत्तपत्राविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर आधारित हा सिनेमा आहे.
‘महाराज’ सिनेमाशिवाय जुनैद आणखी एका चित्रपटात दिसणार आहे. साऊथ अभिनेत्री सई पल्लवीसोबत सध्या तो या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. याशिवाय जुनैद त्याच्या तिसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सज्ज आहे. ‘लव्ह टुडे’ या तमिळ रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असेल, ज्यामध्ये श्रीदेवीची धाकटी मुलगी आणि जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर देखील दिसणार आहे.
हेही वाचा :
अभिनेता तुषार कपूरचा लोकलने प्रवास; म्हणाला “मुंबईच्या ट्रॅफिकला टाळण्यासाठी…”