Actor Tushar Kapoor | तुषार कपूर अभिनेता जितेंद्र यांचा मुलगा आहे. वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने देखील अभिनय क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला. मात्र सध्या तुषार कपूर त्याच्या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. तुषार कपूरने मुंबई लोकलने प्रवास केला आहे. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, सर्वसामान्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनाही मुंबई लोकलचं आकर्षण आहे. अनेक सेलिब्रिटी कधी ट्राफिकचा वेळ वाचवण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. यातच आता ट्राफिकचा वेळ वाचवण्यासाठी तुषारने लोकलला पसंती दिल्याचं दिसत आहे. शनिवारी(२५ मे) रात्री विरार-चर्चगेट लोकलमधून तुषारने प्रवास केला.
View this post on Instagram
हा व्हिडिओ शेअर करत तो म्हणतो, “विरार-चर्चगेट ट्रेनमधल्या फर्स्ट क्लास डब्यात सीट मिळाली आहे, तर एक व्हिडिओ तर काढायलाच हवा ना…जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कामावरुन परतताना मुंबईच्या ट्रॅफिकला टाळण्यासाठी लोकलमधून प्रवास करु शकता”. तुषारनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने मास्क लावलेला दिसत आहे.
सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. तुषार कपूरच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, २००१ साली त्याने ‘मुझे कुछ कहना है’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. Actor Tushar Kapoor |
‘गोलमाल’, ‘गुड बॉय बॅड बॉय’, ‘ढोल’, ‘क्या कूल हैं हम’, ‘धमाल’ या सिनेमांध्ये तो कॉमेडी भूमिका साकारताना दिसला. अभिनेता असण्याबरोबरच तुषार एक निर्माता देखील आहे.
हेही वाचा :
“पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत…” ; नितीश कुमारांच्या विधाननाने चर्चेला उधाण