पुणे – कंगना राणावत सध्या “धाकड’ या आपल्या आगामी सिनेमासाठी जोरदार तयारी करते आहे. “धाकड’ च्या रोलसाठी ती वर्कआऊटवर विशेष भर देते आहे. आपल्या “वर्कआउट’चे काही व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
त्यातील एका व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “जो फिट असतो, तोच हीट होतो’ असे तिने म्हटले आहे. आपल्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेणे आणि निराशावादी लोकांपासून दूर राहणे हा हिट होण्याचा मूलमंत्र असल्याचेही तिने म्हटले आहे.
यापूर्वीही “मणिकर्णिका’ आणि “पंगा’च्यावेळीही कंगनाने आपल्या वर्कआऊटबाबत अशीच काळजी घेतली होती. जयललिता यांच्या बायोपिकसाठी तिने वजन वाढवले होते. आता ते कमी करण्याचा तिचा प्रयत्न चालला आहे. दिवसाची सुरुवात पहाटेच करण्यावर आणि किमान 3-4 तास जीममध्ये घाम गाळल्यावर मनासारखा व्यायाम झाल्याचे समाधान मिळते.
असे तिने यापूर्वीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते. कंगना रणावतचे ट्विटरवर 30 लाख फॉलोवर झाले आहेत. तिने सर्व फॉलोअरना धन्यवाद दिले आहेत आणि आपल्याप्रमाणे फीट राहण्याची सूचनाही केली आहे.