मुंबई – बॉलिवूड सुपरस्टार “हृतिक रोशन’चा आज (दि. १०) वाढदिवस आहे. ह्रितिक केवळ भारतातच नाही तर जगभर आपल्या दमदार अभिनयामुळे आणि हॅंडसम पर्सनॅलिटीमुळे प्रसिद्ध आहे.
गेल्या काही वर्षांपासून तो आपल्या लुक आणि अभिनयामुळे प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे. त्यामुळेच हृतिकचा चाहतावर्ग देखील त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतो.
‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशनचा ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष २०१९’च्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच, यापूर्वी ‘टॉप फाइव्ह मोस्ट हॅन्डसम मेन इन द वर्ल्ड’ या यादीमध्ये हृतिकने स्थान पटकावले होते.
हृतिक रोशन याचे खरे नाव हृतिक राकेश नागरथ असे आहे. बालपणीच त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. १९८० मध्ये जितेंद्र यांच्या ‘आशा’ या चित्रपटात तो बालकलाकाराच्या रूपात दिसला होता.
दरम्यान, ह्रितिकला राकेश रोशन यांच्या “कहो ना प्यार है’ चित्रपटामुळे खरी प्रसिद्ध आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करता आली. या चित्रपटामुळे हृतिक रातोरात स्टार झाला.वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याच्या फॅन्सकडून ह्रितिकवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.