Hollywood News । पॉपस्टार जस्टिन बीबर आणि पत्नी हेली बीबर यांच्याकडे लवकरच पाळणा हलणार आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. जस्टिन बीबरने सोशल मीडियावर एक मनमोहक व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. फोटोंमध्ये हेली बीबर तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. चाहत्यांनी जस्टिन बीबर आणि हेली बीबर यांचे अभिनंदन केले.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये, हेली बीबर लेस गाऊनमध्ये तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली. हेली बीबरच्या मॅटर्निटी फोटोशूटला खूप जास्त लाईक मिळत आहे. कधी हेली बीबर फोटो क्लिक करताना दिसली तर कधी जस्टिन तीला किस करताना दिसला आहे.
जस्टिन बीबरने 2018 मध्ये हेली बीबरशी लग्न केले आणि आता 6 वर्षांनंतर तो पहिल्यांदाच पालक बनण्यासाठी उत्सुक आहे. हेली बीबर ही अमेरिकन मॉडेल आहे. दोघांनी जुलै 2018 मध्ये बहामासमध्ये लग्न केले आणि त्यानंतर दोन महिन्यांनंतर न्यूयॉर्क शहरातील कोर्ट हाऊसमध्ये लग्न केले.
जस्टिन बीबर आणि हेली बीबर यांची पहिली भेट 2006 मध्ये झाली होती. त्यावेळी जस्टिन बीबर सेलेना गोमेजला डेट करत होता. पण सेलेनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तो हेलीला डेट करू लागला. पण 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअपही झाले. पण 2018 मध्ये जस्टिन बीबर आणि हेली पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी लग्न केले.
हे वाचलं का अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ग्राहकांना धक्का! सोनं-चांदी महागलं, १० ग्रॅमचा भाव आता…