जुन्नर -जुन्नर तालुक्यात शुक्रवारी नव्याने 46 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तालुक्यात एकूण रुग्णसंख्येत वाढ होऊन 17 हजार 553 झाली आहे. तर 16 हजार 295 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
595 रुग्णांचा मृत्यू झाला असून 663 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जुन्नर शहर, सुलतानपूर, बारव, नारायणगाव येथे प्रत्येकी 3, आळेफाटा, बेल्हे, आर्वी, डिंगोरे, उदापूर, पिंपळवंडी, बस्ती,
शिरोली बुद्रुक येथे प्रत्येकी 2, तर आळे, आपटाळे, खानगाव, पिंपळगाव जोगा, सीतेवाडी, सांगनोरे, निमगाव सावा, शिरोलीतर्फे आळे, खोडद,
हिवरे बुद्रुक, उंब्रज नं. 2, कांदळी, गोळेगाव, गुंजाळवाडी आर्वी, दातखिळवाडी, येणेरे, काटेडे व कुसूर या गावांत प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.