नवी दिल्ली – देशात 60 हजार किमी लांबीचा वर्ल्डक्लास नॅशनल हायवे बनविण्याचे माझे स्वप्न आहे. मला 2024 पर्यंत ते पूर्णही करायचे आहे. त्यासाठी, दिवसाला 40 किमीचा रोड बनवण्यात येईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
India is about 63 lakh km of the road network, which is the second-largest in the world. Road infrastructure plays a critical role in the growth of the Indian economy: Union Minister Nitin Gadkari at 16th annual conference on 'Road Development in India' yesterday pic.twitter.com/We7BW7589c
— ANI (@ANI) July 9, 2021
रस्ते विकास प्राधिकरणाच्या 16 व्या वार्षिक समारंभ नुकताच पार पडला असून त्यामध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सहभाग नोंदवला आहे. यावेळी बोलताना गडकरी यांनी देशात 2024 पर्यंत देशात 60 हजार किमी लांबीचा वर्ल्डक्लास नॅशनल हायवे बनविण्याचे माझे स्वप्न असल्याचे सांगितले आहे. यासाठी 40 किमीचा रोड बनिवण्यात येईल असेही गडकरी म्हणाले.
भारतात जवळपास 63 लाख किमीचे रस्ते दळणवळ आहे, जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा रस्ते महामार्ग आपल्या देशात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रस्ते दळणवळण हा अतिशय महत्त्वाचा भाग असून अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम या नेटवर्कमुळे शक्य होत असल्याचे नितीन गडकरी म्हणाले आहेत.
सरकारकडून 1.4 ट्रिलीयन डॉलर नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनसाठी मंजूर करण्यात आले असून या क्षेत्रासाठी सरकारकडून दरवर्षी अर्थसंकल्पात जवळपास 34 टक्क्यांनी वाढ करण्यात येते. यंदाही 5.34 लाख कोटी रुपयांचा भरीव निधी वाढवून देण्यात आल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.