जुन्नर तालुक्‍यात फोडाफोडीला येणार ऊत?; 142 ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर, पाहा यादी

नाराज मंडळी न्यायालयाचे दार ठोठावणार

जुन्नर (पुणे) – जुन्नर तालुक्‍यात निवडणूक पार पडलेल्या 49 ग्रामपंचायतींसह 142 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडती शुक्रवारी (दि. 29) जाहीर करण्यात आल्या. यातील 71 ग्रामपंचायतींवर “महिलाराज’ येणार आहे. त्यामुळे इच्छुक पुरुष सदस्यांचा हिरेमोड झाला आहे. तर आता सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने ते पद आपल्याच गटाकडे असावे यासाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

पॅनलप्रमुखांकडून बैठका सुरू झाल्या असून आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येणार अशी चर्चा गावागावांत सुरू आहे. दरम्यान, आरक्षण सोडतीकरीता नाराज झालेली मंडळी न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जुन्नर तालुका पंचायत समितीच्या जिजामाता सभागृहात दि. 5 मार्च 2020 ते 4 मार्च 2025 या कालावधीसाठी सरपंचपदाचे प्रवर्ग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. सरपंच पदाकरीता सोडत चिठ्ठी पद्धतीने काढण्यात आली. फरहान पठाण या विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक शाखा) प्रवीण साळुंखे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, नायब तहसीलदार सचिन मुंढे, सहायक गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, सभापती विशाल तांबे, गुलाब पारखे, उपसभापती रमेश खुडे, अनिल थोरावडे, पंचायत समिती सदस्या नंदा बनकर यांच्यासह अनेक गावांचे पॅनलप्रमुख उपस्थित होते.

सर्वसाधारण : रोहोकडी, धोलवड, संतवाडी, बल्लाळवाडी, शिरोली बुद्रुक, कुमशेत, पिंपळगाव सिद्धनाथ, येणेरे,शिरोली खुर्द, धामणखेल, निमगाव तर्फे म्हाळुंगे, आर्वी, सावरगाव, चिंचोली, भोरवाडी (हिवरे बुद्रुक), ओझर जुने, हिवरे बुद्रुक, धनगरवाडी, वारुळवाडी, शिंदेवाडी, गुळूंचवाडी, जाधववाडी, वडज, उंब्रज नं.1, खामुंडी, काळवाडी, वडगाव कांदळी, खिल्लारवाडी, विठ्ठलवाडी(वडज).

सर्वसाधारण (महिला) : डिंगोरे, वडगाव सहाणी, सुलतानपूर, औरंगपूर, अहिनवेवाडी, ओतूर, डुंबरवाडी, कोळवाडी, पिंपळवंडी, आलमे, नेतवड, अलदरे, निरगुडे, पाडळी, गुंजाळवाडी आर्वी, निमदरी, येडगाव, बोरी खुर्द, पेमदरा, अणे, राजुरी, बोरी बुद्रुक, गुंजाळवाडी (बेल्हे), बांगरवाडी, साकुरी तर्फे बेल्हे, मंगरुळ, उंब्रज नं. 2, बुचकेवाडी, गोळेगाव.

अनुसूचित जमाती : खुबी, तळेरान, मांडवे, पिंपळगाव जोगा, सांगनोरे, निमगिरी, देवळे, जळवंडी, सोनावळे, खटकाळे, खामगाव, घंगाळदरे, उंडेखडक, पारगाव तर्फे मढ, उच्छिल, हातवीज, भिवाडे खुर्द, सुकाळवेढे, माणिकडोह, पांगरी तर्फे मढ, आपटाळे, मढ, घाटघर, धालेवाडी तर्फे हवेली, खोडद, पारगाव तर्फे आळे.

अनूसूचित जमाती स्त्री : चिल्हेवाडी, चावंड, गोद्रे, तांबे, अंजनावळे, आंबेगव्हाण, कोपरे, हडसर, सोमतवाडी, आंबोली, पूर, इंगळून, राजुर, तेजूर, सितेवाडी, बोतार्डे, धालेवाडी तर्फे मिन्हेर, आंबे, केवाडी, भिवाडे बुद्रुक, खानगाव, हिवरे तर्फे मिन्हेर, सुराळे, वानेवाडी, हिवरे खुर्द, वडगाव आनंद, निमगावसावा.
अनुस्‌िूचत जाती : उदापूर, हिवरे तर्फे नारायणगाव.

अनुसुचित जाती महिला : मांदारणे, नारायणगाव, नळावणे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : काले, आळे, तेजेवाडी, शिंदे, कुसुर, दातखिळवाडी, बस्ती, पारुंडे, रानमळा, पिंपरीकावळ, काटेडे, पिंपरीपेंढार, उंचखडकवाडी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : बेलसर, शिरोली तर्फे आळे, तांबेवाडी, ठिकेकरवाडी, राळेगण, आगर, कुरण, खानापूर, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, विघ्नहरनगर, कांदळी, बेल्हे, मांजरवाडी.

धोलवडमध्ये एससीला संधी मिळावी धोलवड ग्रामपंचायत 1952 पासून स्थापन झाले. मात्र, तेव्हापासून अनुसुचित जाती (एससी) प्रवर्गास सरपंचपदाची संधी मिळालेली नाही. शुक्रवारी पार पडलेल्या आरक्षण सोडतीत सरपंचपद सर्वसाधारण जाहीर झाल्यामुळे अनुसुचित जातीचा प्रवर्ग नाराज झाला आहे. त्यामुळे आमच्या प्रवर्गासही इतर समाजाप्रमाणेच संधी मिळावी याकरीता संदीप हरिचंद्र लवांडे यांनी 52 नागरिकांच्या स्वाक्षरीचा अर्ज जुन्नरचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहे.

हिरवे खुर्दचे आरक्षण बदलणार?
हिवरे खुर्द ग्रामपंचायतीकरीता सरपंचपद अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे; मात्र गावातील तीनही वॉर्डमधील नऊ सस्य्यांपैकी एकही महिला अनुसूचित जमाती प्रवर्गातील नसल्यानेहे आरक्षण बदलून मिळावे यासाठी माधुरी अमर वायकर यांनी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदारांकडे अर्ज केला आहे.

औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार जुन्नर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर करत असताना अनुसुचित जाती आणि जमातीच्या आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा नव्याने बदल करण्यात आलेला नसून ते पूर्वीप्रमाणे जाहीर केल्याप्रमाणेच राहणार आहे.
– हनुमंत कोळेकर, तहसीलदार, जुन्नर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.