मुंबई – RRR फेम ज्युनियर NTR च्या श्याम नावाच्या चाहत्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील कोनासीमा येथील राहत्या घरी श्याम मृतावस्थेत आढळून आला. चाहत्यांच्या मृत्यूवर ज्युनियर एनटीआर भावुक झाला असून, त्यांने चौकशीची मागणी केली. जोपर्यंत दोषी सापडत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचे ज्युनियर NTR म्हटले आहे.
We Miss You Shyam 💔🥺#WeWantJusticeForShyamNTR pic.twitter.com/vDmJPAjgwI
— Nadiri Ravi 9999 (@NadiriRRRavi) June 27, 2023
ज्युनियर NTR फॅनचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. २५ जूनला सकाळी श्यामचा मृतदेह घरात पडलेला आढळून आला. रिपोर्ट्सनुसार त्याने आत्महत्या केली होती, पण त्याचे कुटुंबीय आणि मित्र याला खून म्हणत आहेत. आपल्या चाहत्याला श्रद्धांजली वाहताना ज्युनियर एनटीआरने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आवाहन सरकारला केले.
ज्युनियर एनटीआर यांनी एक निवेदन जारी करून या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “श्यामच्या मृत्यूबद्दल जाणून अतिशय दु:ख झाले. श्यामच्या कुटुंबीयांना माझ्या मनापासून संवेदना..तो कोणत्या परिस्थितीत मरण पावला हे न कळल्याने प्रत्येकजण अस्वस्थ झाला असावा. मी सरकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याची विनंती करतो.”
श्याम हा २० वर्षांचा मुलगा होता जो २५ जून रोजी सकाळी कोनासीमा जिल्ह्यातील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. 24 जूनच्या रात्री त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. श्यामच्या मनगट ब्लेड कापलेले आढळले. ते ब्लेड श्यामच्या खिशात सापडले असून पोलिसांनी ते जप्त केले आहे.