Elon Musk : लिंक्डइन व्यतिरिक्त, नोकरी शोधणाऱ्यांसाठी आणखी एक व्यासपीठ आता तयार झाले आहे. इलॉन मस्क यांनी त्यांच्या X प्लॅटफॉर्मवर जॉब सर्च फीचर लाईव्ह केले आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी X चे हे टूल खूप उपयुक्त ठरेल.
X चे जॉब सर्च फीचर Google च्या LinkedIn ला थेट स्पर्धा देईल, कारण LinkedIn चा वापर जॉब सर्च आणि जॉब पोस्टिंगसाठी केला जातो. अशा परिस्थितीत X वर हे फीचर आणल्याने लिंक्डइनला थेट स्पर्धा होईल. X ने हे फीचर बीटा व्हर्जनमध्ये या वर्षी ऑगस्ट महिन्यात लॉन्च केले होते, जिथे त्याची टेस्टिंग चालू होती. दोन महिन्यांनंतर, X ने वेब आवृत्तीसाठी जॉब सर्च फिचर आणले आहे.
Introducing our job search tool.
Start exploring jobs on web at https://t.co/0A5snlK8Ne. pic.twitter.com/4KS0016M5N
— Hiring (@XHiring) November 16, 2023
X चे जॉब सर्च फिचर कसे वापरावे?
जेव्हा तुम्ही X चे जॉब सर्च फिचर उघडता तेव्हा तुम्हाला दोन टेक्स्ट फील्ड ऑप्शन दिसतील ज्यामध्ये तुम्हाला जाॅब टायटल आणि लोकेशन सबमिट करावे लागेल. यानंतर तुम्हाला सर्च ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. त्यासंबंधित कोणताही जाॅब X वर पोस्ट केला तर त्याचे तपशील तुमच्यासमोर येतात.
कोणती कंपनी जाॅब पोस्ट करू शकेल?
केवळ त्या कंपन्या X वर नोकर्या पोस्ट करण्यास सक्षम असतील, ज्यांच्याकडे संस्थांसाठी Verified चे सदस्यत्व आहे. यासाठी कंपन्यांना दरमहा 82,300 रुपये X ला द्यावे लागतील. त्याच वेळी, वापरकर्त्यांना जाॅब सर्च हे फिचर वापरण्यासाठी व्हेरिफाय करणे अनिवार्य नाही. कोणीही येथे जाॅब सर्च करू शकते.