रेणुका सिंग, मेघना सिंग, यास्तिका भाटियाचे पदार्पण
मुंबई – महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेसाठी आज भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. अनुभवी फलंदाज मिताली राज हिच्याकडेच संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. तर संघातील प्रमुख खेळाडू जेमीमा रॉड्रिग्ज आणि शिखा पांडे यांची मागील कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांची निवड करण्यात आलेली नाही.
याऐवजी संघात युवा शेफाली वर्मा आणि अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी यांना स्थान मिळाले आहे. दरम्यान ही स्पर्धा 4 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान न्यूझीलंड येथे होणार आहे. भारतीय महिलांचा सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकमात्र टी 20 सामन्यासाठी निवड समितीने संघाची कमान हरनप्रीतकडे सोपविली असून, स्मृती मानधना उपकर्णधार असेल.
संघ –
विश्वकरंडकासाठी – मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दिप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टिरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव. राखीव – साभिनेनी मेघना, एकता बिश्त, सिमरन दील बहादूर
न्यूझीलंडविरुद्धच्या टी 20 साठी – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दिप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टिरक्षक), स्नेह राणा, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर,तानिया भाटिया (यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, एकता बिश्त, साभीनेनी मेघना, सिमरन डी बहादूर.