बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध लेखक जावेद अख्तर ट्विटरवर सतत ऍक्टिव्ह असतात आणि त्यांच्या कमेंटस्मधून अनेक चर्चाही घडत असतात. जावेद अख्तर हे सामाजिक विषयांवरही आपले मत देत असल्याने त्यांचे ट्विट चर्चेत असते. आता जावेद अख्तर यांनी आपली सोशल मीडिया स्पेस वाढवून इन्स्टाग्रामवर एंट्री केली आहे.
जावेद अख्तर यांनी इन्स्टाग्रामवर आपले अकाऊंट सुरू केले आहे. मात्र, त्यांनी अद्याप आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एकही पोस्ट शेअर केलेली नाही. त्यांचे खाते अद्याप व्हेरिफाइडही केलेले नसतानाही त्यांचे फॉलोअर्स सतत वाढू लागले आहेत. आतापर्यंत एकही पोस्ट नसताना त्यांचे 5700 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर जावेद अख्तर यांनी 6 जणांना फॉलो केले आहे, ज्यात त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य आहेत.
दरम्यान, शबाना आझमी यांनी जावेद अख्तर हे इंस्टाग्राम अकाऊंटवर आल्याची माहिती दिली आहे. शबाना आझमी यांनी जावेद अख्तरचे एक चित्र शेअर केले आणि लिहिले की, तुम्हीही शेवटी इंस्टाग्रामवर आला आहात. तुमचे स्वागत आहे. यावर मिर्झा, अदिती राव हैदरी, दिव्या दत्ता यांनी या फोटोवर कमेंट केली आहे. तसेच या स्टार्सनी जावेद अख्तर यांचे स्वागतही केले आहे.