जान्हवी कपूर गिरवते कथ्थक नृत्याचे धडे

जान्हवी कपूर सध्या शास्त्रीय नृत्य शिकते आहे. तिने अलीकडेच सोशल मीडियावर आपल्या शास्त्रीय नृत्याच्या सरावाचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामध्ये ती कथक नृत्य करताना दिसते आहे. ‘शुभमंगल सावधान’ च्या गाण्यावर ती हा सराव करते आहे. जान्हवीच्या फॅन्सच्या बरोबर तिची धाकटी बहीण खुशी देखील या व्हिडिओमुळे प्रभावित झालेली दिसते आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवीने बॉलीवुड करिअर सुरू केले तेव्हा लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली होती. केवळ चांगले दिसणे पुरेसे नाही. म्हणून आणखीन चांगले गुण विकसित करणे आवश्‍यक असल्याचे तिला जाणवले. म्हणूनच तिने कथ्थक शिकायला सुरुवात केली. जान्हवीची आई श्रीदेवी उत्तम नृत्यांगना होती. म्हणूनही तिने हा नृत्याचा वारसा पुढे सुरू ठेवायचे ठरवले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

यापूर्वीही तिने आपल्या डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये ती वहिदा रेहमान यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘पिया तोसे नैना लागे रे’च्या तालावर नृत्य करताना दिसली होती. जान्हवी सध्या राजकुमार राव बरोबर ‘रुह अफसाना’ मध्ये काम करते आहे. याशिवाय ‘दोस्ताना 2’ मध्येही ती असेल. ‘दोस्ताना 2’ मध्ये तिच्याबरोबर कार्तिक आर्यन लीड रोलमध्ये असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.