नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षांना आता जालीनवाला बाग राष्ट्रीय स्मारकावर पदसिद्ध विश्वस्त म्हणून काम करता येणार नाहीं. तशा आशयाचे दुरूस्ती विधेयक आज लोकसभेत संमत करण्यात आले. या स्मारकाच्या कायदेशीर तरतूदीत कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या स्मारकाचे पदसिद्ध विश्वस्त असतील असे नमूद करण्यात आले आहे.
संसदेतील दुरूस्ती विधयेकाद्वारे ही तरतूद आता रद्द करण्यात आली आहे. आवाजी मतदानाने हे विधेयक संमत करण्यात आले, त्यावेळी कॉंग्रेस सदस्यांनी सभात्याग केला. तत्पुर्वी या विधेयकावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सुचवलेल्या दुरूस्त्या फेटाळण्यात आल्या. प्रत्यक्ष हे विधेयक मतदानाला टाकण्यात आले, त्यावेळी विरोधकांनी त्यावर मतविभागणी मागितली. त्यावेळी 214 विरूद्ध 34 मतांनी हा प्रस्ताव संमत करण्यात आला.