इंदापूर येथे राज्यमंत्री भरणे यांची ग्वाही
रेडा- इंदापूर तालुक्यातील गोरगरीब, मागासवर्गीयांनी आपल्यावर केलेले प्रेम व उपकार आपण आयुष्यात कधी ही विसरु शकणार नाही.त्यांच्या हितासाठी कराव्या लागणाऱ्या कामाकरिता पडेल ती किंमत देण्याची आपली तयारी आहे, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
रोटरी क्लबच्या वतीने डॉ. आंबेडकरनगर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगर, लोकमान्यनगर परिसरातील नागरिकांना रोगप्रतिबंधासाठी आर्सेनिक आल्बम 30 या होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते व राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, नगरपरिषदेच्या महिला विकास व बालकल्याण विभागाच्या सभापती राजश्री मखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी भरणे बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, वसंत माळुंजकर, प्रा. अशोक मखरे, दादासाहेब सोनवणे, इंदापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष राकेश गानबोटे, नगरसेवक गजानन गवळी, पोपट शिंदे, अनिकेत वाघ, अमर गाडे, उदय शहा, अजिंक्य इजगुडे, सुनील मोहिते, नितीन लोंढे, प्रशांत भिसे, भीमाशंकर जाधव, धरमचंद लोढा, ज्ञानदेव डोंबाळे, रिपाइंचे जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे, महेश लोखंडे, विकास खिलारे, शिवसेनेचे शहर प्रमुख महादेव सोमवंशी, बन्सी भंडलकर, अहेमदरजा सय्यद आदि मान्यवर उपस्थित होते.