Israel Palestine War : इस्रायल-हमास युद्ध (Israel Palestine War) सुरु होऊन आज दहा दिवस झाले आहेत. या दाह दिवसात आज दोन्ही बाजुंनी पाच तासांचा युद्धविराम (Israel Hamas War Ceasefire) घोषित करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार 11.30 वाजता इस्रायल-हमास संघर्षात 5 तासांचा युद्धविराम सुरू झाला आहे. हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने (Israel) हमासला नेस्तनाभूत करण्याची शपथ घेतली आहे. इस्रायली(Israel) सैन्याने गाझाला संपूर्णपणे वेढा घातला आहे.
पाच तासांचा युद्धविराम सुरू झाला असून यावेळी, अनेक देशांमधून पाठवण्यात आलेली जीवनावश्यक वस्तूंची मदत इस्रायल-गाझा सीमेवर असलेल्या रफाह क्रॉसिंगद्वारे दक्षिण गाझाला पाठवली जाणार आहे. यामध्ये सुमारे 1000 टन मदत सामग्री 100 ट्रकद्वारे दक्षिण गाझा येथे नेली जाणार आहे. या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण संयुक्त राष्ट्राद्वारे केले जाणार आहे. इस्रायलचे (Israel) सैन्य मोठ्या संख्येने गाझाच्या सीमेवर तैनात असून हमास विरोधातील मोठं ग्राउंड ऑपरेशन कधीही सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गाझामध्ये घुसून हमासचे अस्तित्व मिटवण्याची इस्रायली (Israel) सैन्याची योजना आहे. यासाठी गाझा सीमेवर लाखो इस्रायली सैनिक तैनात आहेत. इस्रायल (Israel) लष्कर रणगाडे, चिलखती वाहने, क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेसह सुमारे 3 लाख सैनिक गाझा सीमेवर उपस्थित आहेत. इस्रायली सैनिकांसमोर हमासचा खात्मा करण्याचे उद्दिष्ट आहे.
इस्रायल (Israel) सरकारचा आदेश मिळताच इस्रायल लष्कर गाझामध्ये शिरून हमासवर थेट हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर इस्रायलचे नौदलही समुद्रात हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या तयारीत आहे. इस्रायल-हमास युद्धात (Israel Palestine War) आतापर्यंत दोन्ही बाजूंनी चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत.