#IREvIND 2nd T20 Toss update : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा मर्यादित 20 षटकांचा एकदिवसीय क्रिकेट सामना आज डब्लिन इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होणार आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा (TOSS) कौल हा आयर्लंड संघाच्या बाजूनं लागला आहे. (Ireland have won the toss and elect to bowl first in the 2nd T20I) आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.या सामन्यात भारतीय संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरला आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यात पावसामुळे संपूर्ण खेळ होऊ शकला नसला तरी दुसऱ्या सामन्यापूर्वी हवामान स्वच्छ आहे. अशा स्थितीत दुसऱ्या टी-२०मध्ये पूर्ण ४० षटके खेळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार जिंकला होता आणि आता दुसरा सामनाही जिंकून टीम इंडियाला मालिका आपल्या नावावर करायची आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकून मालिकेत कायम राहण्याचा आयर्लंडचा प्रयत्न असेल.