IPL 2024, Live Cricket Score, MI vs CSK : आज IPL 2024 चा 29 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी याने दिलेला फिनिशिंग टच आणि शिवम दुबे-कर्णधार ऋतुराज गायकवाड या दोघांनी केलेल्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 206 धावा केल्या.
First half done 💥
Now to shine with the ball! 🥳💛 #MIvCSK #WhistlePodu pic.twitter.com/sZWbPoQR3m— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 14, 2024
महेंद्रसिंग धोनी सीएसकेसाठी शेवटच्या षटकात फलंदाजीला आला. खेळपट्टीवर येताच त्याने मैदान गाजवले. धोनीने 4 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या. त्याने सलग 3 षटकार मारले. मुंबईसाठी हार्दिक पांड्याने शेवटचे षटक टाकले. या षटकात त्याने 26 धावा दिल्या. अजिंक्य रहाणे आज सलामीला आला, पण डावाच्या दुसऱ्या षटकात 5 धावा काढून बाद झाला. रचिन रवींद्रने 16 चेंडूत 21 धावांची खेळी खेळली तर डॅरिल मिशेल 17 धावा करून बाद झाला. पण कर्णधार रुतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी सर्वाधिक प्रभावित केले.
चेन्नईकडून रुतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी चमकदार कामगिरी केली. दुबे आणि गायकवाड यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी झाली. दुबेने 38 चेंडूंचा सामना करत नाबाद 66 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले. गायकवाडने 40 चेंडूत 69 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 5 षटकार मारले.
IPL 2024 : पंजाब किंग्जला दुहेरी झटका, कर्णधार ‘शिखर धवन’ बाबत मोठी अपडेट आली समोर….
धोनीचा फिनिशिंग टच…
15 षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या 149 धावा होती, पण पुढच्या 2 षटकात केवळ 12 धावा झाल्या. त्यामुळे संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडता येणार नाही असे वाटत होते. पण शेवटच्या षटकात फलंदाजीला आलेल्या धोनीने हार्दिक पांड्याच्या 3 चेंडूत 3 षटकार ठोकले. हार्दिकने टाकलेल्या शेवटच्या षटकात एकूण 26 धावा आल्या, ज्यामुळे CSK ने 206 धावा केल्या. धोनीने अवघ्या 4 चेंडूत 20 धावा केल्या आहेत.
IPL 2024 (KKR vs LSG Match 28) : सॉल्टची झंझावती खेळी, कोलकाताचा लखनौवर सहज विजय….
मुंबईसाठी हार्दिक पंड्या आणि शेफर्ड सर्वात महागडे गोलंदाज ठरले. शेफर्डने 2 षटकात 33 धावा दिल्या. पंड्याने 3 षटकात 43 धावा दिल्या असल्या तरी त्याने 2 विकेट्स घेतल्या. श्रेयस गोपाल आणि जेराल्ड कोएत्झी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.