Live Cricket Score, LSG vs PBKS Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा सामना आज पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळला जात आहे. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. आयपीएलच्या 11व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि क्विंटन डी कॉकच्या झंझावाती खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जला 200 धावांचे लक्ष्य दिले. लखनौने 20 षटकांत आठ गडी गमावून 199 धावा केल्या.
डी कॉक आणि केएल राहुल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी झाली, जी चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अर्शदीप सिंगने मोडली. त्याने केएल राहुलला आपला बळी बनवले. त्याला केवळ 15 धावा करता आल्या. या खेळीदरम्यान त्याने 1 चौकार आणि 1 शानदार षटकारही लगावला.
देवदत्त पडिक्कलचा खराब फॉर्म कायम राहिला, तो केवळ 9 धावा करून बाद झाला. त्याला सॅम करनने बाद केले. सहाव्या षटकाच्या सुरुवातीला 45 धावांवर एलएसजीने 2 महत्त्वाचे विकेट गमावले होते. मार्कस स्टॉइनिसने 2 शानदार षटकार ठोकून लखनौसाठी मोठ्या धावसंख्येच्या आशा उंचावल्या, पण तो 12 चेंडूत 19 धावा करून बाद झाला.
दरम्यान, निकोलस पूरन क्रीजवर आला, त्याची क्विंटन डी कॉकसोबतची भागीदारी पंजाबच्या अडचणीत वाढ करत होती, पण त्यानंतर 54 धावांच्या स्कोअरवर क्विंटन डी कॉकने आपली विकेट गमावली. त्याने 38 चेंडूत 54 धावांची खेळी खेळली, ज्यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. 15 षटकांत संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 146 धावा होती.
त्यानंतर कागिसो रबाडा 16 वे षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर पूरनला बाद केले. पुरनने 21 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार लगावत 42 धावा केल्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये क्रुणाल पांड्या नावाचं वादळ आलं. वेगवान किंवा संथ चेंडू असो, क्रुणाल कोणालाही सोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. पंड्याने 22 चेंडूत 43 धावांची तुफानी खेळी खेळली आणि एलएसजीला 20 षटकात 199 धावांपर्यंत नेले. त्याचवेळी रवी बिश्नोईला खातेही उघडता आले नाही. या सामन्यात मोहसीन खानने दोन धावा केल्या तर नवीन उल हक एकही धाव न काढता नाबाद राहिला.
T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकासाठी BCCI ‘या’ 15 खेळाडूंची करू शकते निवड, पहा यादी…
शेवटच्या 9 षटकात 104 धावा…
11व्या षटकापर्यंत लखनौ सुपर जायंट्सची धावसंख्या 3 बाद 95 धावा होती. मात्र अखेरच्या 9 षटकांत निकोलस पुरन आणि कृणाल पांड्या यांच्या स्फोटक खेळीमुळे एलएसजीच्या फलंदाजांनी 104 धावा केल्या. लखनौच्या फलंदाजांनी या डावात 10 गगनचुंबी षटकार मारून पंजाबच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले. अर्शदीप सिंग, राहुल चहर आणि हर्षल पटेल यांनी 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. पंजाबसाठी अर्शदीप सिंग आणि राहुल चहर यांनी महत्त्वाच्या विकेट घेतल्या, पण त्यांची खूप धुलाई झाली. पंजाबकडून सॅम करनने तीन आणि अर्शदीप सिंगने दोन तर कागिसो रबाडा आणि राहुल चहरने प्रत्येकी एक विकेट घेतली.