IPL 2024 (LSG vs DC Match 26, Toss upade) : आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे संघ आमनेसामने येणार आहेत. भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे दोन्ही संघांमधील सामना खेळवला जाईल. त्याच वेळी हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
के.एल. राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौची स्थिती अजूनही चांगली आहे, पण ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीची कामगिरी आत्तापर्यंत अत्यंत वाईट राहिलेली आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स आपला पराभवाचा सिलसिला तोडण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तर केएल राहुलच्या लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या घरच्या मैदानावर विजयाची मालिका कायम ठेवायची आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा (Toss) कौल हा लखनौ सुपर जायंट्स संघाच्या बाजूनं लागला आहे. (Lucknow Super Giants won the toss and elected to bat) कर्णधार केएल राहुलने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨
Lucknow Super Giants elect to bat against Delhi Capitals.
Follow the Match ▶️ https://t.co/0W0hHHG2sq#TATAIPL | #LSGvDC pic.twitter.com/1MQFaSJ8my
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2024
दरम्यान, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात IPL मध्ये आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले आहेत. यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने तिन्ही सामने जिंकले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सला एकही सामना जिंकता आलेला नाही. जर आपण दोन्ही संघांच्या अलीकडील गुणतालिकेबद्दल बोललो तर एलएसजीने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि त्यांचे 6 गुण आहेत. सध्या संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
दुसरीकडे दिल्लीने आतापर्यंत 5 सामने खेळले असून त्यापैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. यासह, संघ दोन गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असणार असून जो संघ चांगली कामगिरी करेल तो जिंकेल.