IPL 2024 ( GTvsSRH Match 12) :- गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आज (रविवार,31 मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. गुजरात आपला शेवटचा सामना हरल्यानंतर मैदानात उतरत आहे तर हैदराबादने आपल्या शेवटच्या सामन्यात मुंबईचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्ससमोर सध्या चांगल्या फॉर्मात असणाऱ्या सनराईझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे.
गुजरात हैदराबादला रोखणार?
रविवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात गुजरातसमोर हैदराबादची दमदार धावसंख्या रोखण्याचे आव्हान असणार आहे. कारण, हैदराबादने गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 धावा करून आयपीएलमध्ये सर्वाच्च धावसंख्येचा विक्रम रचताना मोसमातील पहिला विजय मिळवला. तर गुजरातने घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून सुरुवात केली पण चेन्नईविरुद्ध अखेरचा सामना गमावला. त्यामुळे, गुजरातला फलंदाजीसह गोलंदाजीतही सुधारणा करावी लागणार आहे.
GT vs SRH : Head To Head Records
आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सच्या पदार्पणापासून, गुजरात आणि हैदराबादमध्ये आतापर्यंत फक्त 3 IPL सामने खेळले गेले आहेत. गुजरातने त्यापैकी 2 तर हैदराबादने 1 सामना जिंकला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरातची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 199 आणि गुजरात टायटन्सविरुद्ध हैदराबादची सर्वोच्च धावसंख्या 195 आहे.
IPL (2008 – 2024) : आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे Top-10 फलंदाज, पाहा यादी…
दरम्यान, गुजरात दोन सामन्यांतून 2 गुणांसह गुणतालिकेत 7 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, हैदराबादचेही दोन सामन्यांतून 2 गुण आहेत, मात्र जास्त नेट रनरेटमुळे ते चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, 24 मार्च रोजी झालेल्या स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात GT ने मुंबई इंडियन्स विरुद्ध 6 धावांनी विजय मिळवला. 26 मार्च रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्यांना चेन्नई सुपर किंग्जकडून 63 धावांनी पराभव पत्करावा लागला.