IPL 2024 ( CSKvsDC Match 13) : आयपीएल 2024 चा 13 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर रविवार, 31 मार्च रोजी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आतापर्यंत त्यांची सुरुवात खूपच खराब झाली आहे.
आयपीएल हंगामात सलग दोन पराभवानंतर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघ रविवारी होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करून स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या शोधात असणार आहे. भीषण अपघातानंतर मैदानावर दीड वर्षांनी परतलेला दिल्लीचा कर्णधार पंत अद्यापही चांगल्या कामगिरीच्या प्रतिक्षेत आहे.
त्याच्यापाठोपाठ कॅपिटल्सची फलंदाजी डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या सलामीवीरांवर जास्त अवलंबून असल्याचे दिसते. त्यात फलंदाजीची फळी वाढवण्यासाठी संघात सलामीवीर पृथ्वी शॉला या सामन्यात संधी मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यात गोलदाजीतही दिल्लीची कामगिरी तितकीशी समाधानकारक राहिलेली नाही. खासकरून डेथ ओव्हर्समध्ये डीसीच्या गोलंदाजांनी घोर निराशा केल्याचे पाहायला मिळालेले आहे.
दुसरीकडे, चेन्नई स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड सुरू ठेवण्याचा प्रयत्न करेल. चेन्नईने आत्तापर्यंत फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे, विजयासाठी दिल्लीसमोर चांगली कामगिरी करण्याशिवाय अन्य कुठलाही पर्याय नाही.
IPL (2008 – 2024) : आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे Top-10 फलंदाज, पाहा यादी…
DC vs CSK: Head to head records of both teams
दरम्यान, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाने आयपीएल 2024 च्या सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. दुसरीकडे ऋतुराज गायकवाडचा चेन्नई सुपर किंग्ज सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स आयपीएलमध्ये एकूण 29 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये डीसीने एकूण 10 सामने जिंकले आहेत, तर चेन्नई सुपर किंग्ज 19 विजयांसह आघाडीवर आहे.