नवी दिल्ली – इंडियन प्रीमिअर लीग 2023 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा हायव्होल्टेज सामना होणार आहे. आयपीएल 2023 पहिल्या लढतीत राजस्थानने चेन्नई येथे सीएसके वर 3 धावांनी विजय मिळवला आहे. आता परतीच्या सामन्यात सीएसके त्याची परतफेड करण्यास उत्सुक आहे.
The two are out to make a statement, it seems! 👌 👌@rajasthanroyals are dealing in boundaries in Jaipur! 💪 💪#RR 42/0 after 3 overs.
Follow the match ▶️ https://t.co/LoIryJ4ePJ#TATAIPL | #RRvCSK pic.twitter.com/TlWHZVaumP
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2023
तसेच 2019 मध्ये जेव्हा दोन्ही संघ जयपूरच्या सवाई मान सिंग स्टेडियमवर भिडले होते, तेव्हा खूप मोठा राडा झाला होता. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा रुद्रावतार सर्वांनीच पाहिला होता. दरम्यान, आज होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघाची फलंदाजी व गोलंदाजी उत्तम असून RR चा संघ CSK ची विजयाची घोडदौड रोखु शकेल का? हे बघणं महत्वाचे ठरेल.
अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन) – यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिककल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन )- ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), मथीशा पाथिराना, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना, आकाश सिंग