iPhone 16 series : नवीन iPhone सीरीज iPhone 16 या वर्षी लॉंच होणार आहे. साधारणपणे, Apple चा नवीन iPhone सप्टेंबरमध्ये लॉंच केला जातो. या वर्षी देखील, सप्टेंबरमध्ये iPhone 16 मालिका लॉंच होण्याची शक्यता आहे, परंतु यावेळी काहीतरी वेगळ होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या वर्षी चार नव्हे तर पाच आयफोन मॉडेल लॉंच केले जातील.
समोर आलेल्या रिपोर्टनुसार, या वर्षी Apple पाच नवीन आयफोन लॉंच करेल जे आयफोन 16 सीरीजचे असतील. iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max या सर्व मॉडेल व्यतिरिक्त यंदा iPhone 16 SE देखील लॉंच केले जातील. | iPhone 16 series
Apple सहसा iPhone SE स्वतंत्रपणे लॉंच करत असतो. परंतु रेगुलर सिरीजमध्ये त्याचा समावेश नाही. त्यामुळे iPhone X प्रमाणेच iPhone 16 SE आणि iPhone 16 Plus SE सह सिंगल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल अशी देखील सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. | iPhone 16 series
iPhone 16 ची वैशिष्ट्ये
iPhone 16 च्या बेस मॉडेलसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल, तर iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max सह तीन रियर कॅमेरे मिळू शकतात. समोर आलेल्या माहितीनुसार, iPhone 16 SE मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले असेल ज्याचा रीफ्रेश दर 60Hz असेल. तर iPhone 16 Plus SE सह 6.7 इंच स्क्रीन मिळू शकते. या दोन्हीसह डायनॅमिक आयलंडचे फिचर देखील उपलब्ध होऊ शकते.