नवी दिल्ली – राम जन्मभूमी आंदोलनात सुरुवातीपासून सक्रिय सहभाग असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना अयोध्येत पुढच्या महिन्यात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. आडवाणींच्या नेतृत्वाखाली त्यावेळी देशभरात वेगवेगळ्या रथयात्रा निघाल्या.
आता पुढच्या महिन्यात राम मंदिराचे उद्घाटन होईल. त्यासाठी या दोन्ही नेत्यांना आमंत्रण देण्यात आले असले तरी हे नेते उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. याच कारण आहे लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचे वाढत वय आणि प्रकृती. त्यांच्या वयाचा विचार करुन, त्यांना येऊ नका अशी विनंती केली आहे.
ती दोघांनी मान्य केली असल्याचे असे राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चम्पत राय यांनी पत्रकारांना सांगितले. 22 जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होईल. त्याची जोरात तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील असे राय यांनी सांगितले. सर्व तयारी 15 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. प्राण प्रतिष्ठा 16 जानेवारीला सुरु होईल. 22 जानेवारीपर्यंत हे विधी सुरु राहतील असं राय यांनी सांगितलं.
या कार्यक्रमासाठी कोणा-कोणाला निमंत्रित केले आहे, त्याची माहितीही राय यांनी दिली. प्रकृती आणि वय या कारणांमुळे आडवाणी आणि जोशी कदाचित प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार नाहीत, असे ते म्हणाले. लालकृष्ण आडवाणींच वय आता 96 आणि मुरली मनोहर जोशी 90 वर्षांचे आहेत.