नवी दिल्ली – रिलायन्स रिटेलमध्ये सिंगापूर येथील जीआयसी व जागतिक गुंतवणूकदार संस्था असलेल्या टीपीजी कॅपिटलने 7,350 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
कंपनीने आज जारी केलेल्या माहितीनुसार रिलायन्स रिटेलमध्ये या महिन्यात झालेली एकूण गुंतवणूक 32,197 कोटी रुपयापर्यंत गेली आहे. जीआयसीने रिलायन्स रिटेलमध्ये 5,512 कोटी रुपयांची तर टीपीजेने 1,837 कोटी रुपये गुंतवले आहेत.
टीपीजीने रिलायन्स जिओ या कंपनीतही या अगोदर 4,546 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ज्या कंपन्यांनी रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली आहे त्या कंपन्यांना रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देण्यात आली आहे.