नारायणगाव- येडगावात व हिरवे (ता. जुन्नर) येथे विनापरवाना डीजेवर मोठमोठ्याने गाणे लावल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी डीजे मालकावर गुन्हा दाखल करून दोन डीजे गाड्या जप्त केल्या आहेत. ही करावाई शनिवारी (दि. 1) रात्री पोलिसांनी केली.
येडगाव येथे विशाल नवनाथ भोर व हिरवरे विजय मच्छिंद्र मोरे या डीजे मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबतची माहिती अशी की, येडगाव गावच्या हद्दीत कुकडी कॉलनी रस्त्यावर 14नंबर येथे (एमएच 17 टी 2266) या वाहनांमध्ये विशाल भोर मोठ्या आवाजात विनापरवाना डीजेवर गाणी वाजवत असताना मिळून आले. तर हिवरे गावात विजय मच्छिंद्र मोरे (एमएच 06 जी 5913) या गाडीवर डीजे लावून मोठ्या आवाजात गाणी वाजवत होते. शनिवारी (दि. 1) रात्री पेट्रोलिंग करत असताना सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, पोलीस उप निरीक्षक अभिजित पवार, पोलीस हवालदार एस. एम. टाव्हरे, रामचंद्र शिंदे, योगेश गारगोटे यांना हा प्रकार आढळून आला. पुढील तपास पोलीस नाईक जढर करीत आहेत.