पिंपरी, दि. 28 – पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील सात पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. तर दोन पोलीस निरीक्षकांना पदस्थापना करण्यात आली आहे.सोमवारी (दि. 27) आस्थापना मंडळाची बैठक पार पडली.
आस्थापना मंडळाच्या मान्यतेने पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जितेंद्र कदम (भोसरी पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा युनिट दोन), अरविंद पवार (भोसरी पोलीस स्टेशन ते खंडणी विरोधी पथक), सतीश नांदुरकर (गुन्हे शाखा युनिट दोन ते वाहतूक शाखा), अजय जोगदंड (खंडणी विरोधी पथक ते वाहतूक शाखा), नितीन लांडगे (तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन ते परकीय नोंदणी विभाग), राजेंद्रकुमार राजमाने (विशेष शाखा एक ते नियंत्रण कक्ष), शंकर बाबर (विशेष शाखा एक ते नियंत्रण कक्ष) अशा बदल्या झाल्या आहेत.
शहरात नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांची देहूरोड पोलीस स्टेशन (गुन्हे), तेजस्विनी कदम यांची निगडी पोलीस स्टेशन (गुन्हे) येथे पदस्थापना करण्यात आली आहे.