पुणे – ॲप्पल युनिसेक्स सलोनने नोंदणी केलेल्या ट्रेडमार्क आणि लोगोचे सलोन ॲप्पलने उल्लंघन केल्याप्रकरणी ॲप्पल युनिसेक्स सलोनला अंतरिम आदेश मिळाला आहे. यामध्ये जिल्हा न्यायाधीश यांनी सलोन ॲपलला या वादावर दाव्याच्या अंतिम निर्णय येईपर्यंत ॲप्पल युनिसेक्स सलोनचा ट्रेडमार्क व लोगो यांचा बेकायदेशीर वापर न करण्याचे आदेश दिले आहेत.
मेसर्स ॲप्पल युनिसेक्स सलोनच्या प्रोप्रायटर कविता अंकुश बोरुडे यांनी ॲप्पल युनिसेक्स सलोनच्या ट्रेडमार्क्स आणि लोगो यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सलोनॲप्पलच्या विरोधात ट्रेडमार्क्स अधिनियम अंतर्गत दावा दाखल केला आहे.
कविता अंकुश बोरुडे यांच्या निदर्शनास आले की, सलोन ॲप्पल यांनी अशाच प्रकारचा ट्रेडमार्क बेकायदेशीरपणे कॉपी केला व मेसर्स ऍप्पल युनिसेक्स सलोनच्या ट्रेडमार्कचे व ट्रेडमार्क्स अधिनियम, चे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांनी आपल्या वकिलामार्फत सलोन ऍप्पल यांच्या विरूद्ध दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला.
ॲडव्होकेट सुशांत प्रभुणे आणि ॲडव्होकेट निवेदिता भालेराव यांनी न्यायालयात ॲप्पल युनिसेक्स सलोनची बाजू मांडली.