राहाता – राज्यात पुन्हा कोरोना चा संसर्ग वाढत असतांनाच राहता शहरासह परिसरात कोरोना पेशंटचा आलेख वाढता आहे. प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन नागरिक काटेकोरपणे करत नसल्यामुळे राहाता शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय राहाता नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी 30 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत लॉकडाउन घोषित केला आहे यामध्ये दवाखाने मेडिकल व वैद्यकीय सेवा वगळता इतर व्यवसायीकांना आपले व्यवसाय सात दिवस पुर्णपणे बंद ठेवावी लागणार आहे.
तर प्रशासनातर्फे नागरिकांना जाहिर आव्हान करून मास्क वापरणे सुरक्षित अंतर ठेवणे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये कोरोना आळा घालण्यासाठी नागरिकांनी घरा च्या बाहेर पडू नये, आपली स्वतःची व आपल्या कुटुंबा ची काळजी घ्यावी, तसेच राहाता शहरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आव्हान राहता नगर परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
राहाता शहर वैद्यकीय क्षेञ वगळता सात दिवस बंद राहाणार असल्याने इतर व्यावसायिक व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे नियमांचे उंलघ्घन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल (प्रशांत कंदारे-सहायक पोलीस निरीक्षक राहाता)