पुणे :- आंतर कचेरी क्रीडा संघटना व शारदा स्पोर्ट्स सेंटर यांनी आयोजित केलेल्या आंतर कचेरी टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिला गटात वीरेश राणा व अंकिता अग्रवाल यांना (Inter Office Table Tennis Tournament) विजेतेपद मिळाले. ओंकार जोग यांनी वरिष्ठ दुहेरी व पुरुष दुहेरी या दोन्ही गटाबरोबरच सांघिक विभागात अजिंक्यपद पटकावित तिहेरी कामगिरी केली.
पुरुषांच्या एकेरीत वीरेश राणा (इंटेल) यांनी अंतिम फेरीत अक्षय देशपांडे (एसडी) यांचा ११-८,११-३,११-९,११-२ असा पराभव केला. दुहेरीमध्ये ओंकार जोग व अतुल बापट (सुकृत इलेक्ट्रिक कंपनी प्रायव्हेट लिमिटेड) यांनी अंतिम लढतीत अभिषेक श्रीवास्तव व नवीन नातू (टीसीएस) यांच्यावर १४-१२,११-७,११-४ अशी मात केली.
महिलांच्या एकेरीत अंकिता अग्रवाल (डी ए सी एस) यांनी मेघना कुक्का (सोशल सी सी) यांना ८-११,६-११,११-९,११-५,११-९, ११-६ असे पराभूत केले. दुहेरीमध्ये चंद्रमा रामकुमार व दिव्या गेहलोद (टीसीएस) यांनी अर्जिता निगम व राधिका जोशी (मास्टर कार्ड) यांना ११-४,११-७, ११-६ असे एकतर्फी लढतीत पराभूत केले. मिश्र दुहेरीत मेघना कुक्का व तन्मय घोष यांनी विजेतेपद मिळविताना केदार अहिरवाडकर व अंकिता अग्रवाल यांच्यावर ११-७,८-११,१३-११,११-८ असा विजय मिळविला.
Asian Olympic Qualifiers Shooting 2024 : अखिल शेओरानला सुवर्ण तर तोमरला रौप्यपदक…
वरिष्ठ गटाच्या एकेरीत अमित ढेकणे यांनी ओंकार जोग यांच्यावर १३-११,१०-१२,११-९,५-११, १२-१० अशी मात केली. दुहेरीत मात्र अमित व नवीन नातू यांना ओंकार व अतुल बापट यांनी ११-६,१०-१२,७-११,११-४,११-८ असे पराभूत केले आणि विजेतेपद पटकाविले. सांघिक विभागात सुकृत इलेक्ट्रिक संघाने टाटा कन्सल्टन्सी संघाचा ३-२ असा पराभव केला.