पुणे -जिल्हा परिषद मुख्यालयात आरोग्य विभागातील कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व विभाग क्वारंटाइन केला. त्याचवेळी एक सदस्यही बाधित सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच कर्मचाऱ्यांची करोना चाचणी घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली. दरम्यान, सोमवारी जवळपास 157 जणांची करोना चाचणी करण्यात आली.
जलसंधारण व्यवस्थापन समितीची बैठक दोन दिवसांपूर्वी झाली. यात पॉझिटिव्ह सदस्यही उपस्थित होते. हे सदस्य अनेक विभागांत गेल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासोबतच अर्थ आणि स्वच्छता विभागातील एक कर्मचारीही पॉझिटिव्ह आढळला होता. खबरदारीचा उपाय म्हणून या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचे विलगीकरण केले. तर जिल्हा परिषद परिसराचे निर्जंतूकीकरण करण्यात येत आहे.