पुणे: कॅम्प परिसरात गुरुवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास डॉ. कोयाजी रस्त्यावरील लष्कर पोलीस ठाणे जवळ इनोव्हा कारला ( Innova Car) आग लागली होती. पुणे कॅन्टोन्मेंट अग्नीशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन दलाचे तांडेल विकास खराडे, दिनेश शिंदे, अभिजीत घुमटकर, विशाल दगडे, नवनाथ चव्हाण आणि ड्रायव्हर इम्रान तांबोळी यांनी ही आग आटोक्यात आणली.