पुणे – सदाशिव पेठ येथील रहिवासी श्रीमती इंद्रायणीबाई सदाशिवराव नरळे वय 87 यांचे वृद्धापकाळाने दिनांक 15.09.2021 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या वारकरी सांप्रदायाच्या पाईक होत्या. अनेक वर्षे त्यांनी महिन्याची पंढरपूरची वारी नित्याने केली होती. भारतीय वारकरी मंडळाचे विश्वस्त ह भ प निवृत्ती सदाशिवराव नरळे यांच्या त्या आई होत.