क्विन्सलॅंड – भारताच्या महिला संघाची नवोदित गोलंदाज शिखा पांडे हिने टाकलेल्या एका अप्रतिम रिव्हर्स स्विंग चेंडूचे सध्या जागतिक क्रिकेटमध्ये प्रचंड कौतुक होत आहे. हा चेंडू तिने महिलांच्या टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाची फलंदाज एलिसा हिली हिला टाकला व तिचा त्रिफळा उडाला.
भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाशी खेळत आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 4 गडी राखून पराभव झाला. मात्र, या लढतीत सर्वाधिक चर्चा झाली ती शिखाने टाकलेल्या जादूई चेंडूची.
Ball of the century, women’s cricket edition! Take a bow Shikha Pandey🙌🏻 #AUSvIND pic.twitter.com/WjaixlkjIp
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) October 9, 2021
शिखाने टाकलेला हा चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर पडला होता. एलिसाला हा चेंडू बाहेर जाणार असे वाटल्याने तिने तो सोडण्याचा पवित्रा घेतला मात्र, हा चेंडू जणू 90 अंशाच्या कोनात स्विंग झाला व त्यावर एलिसाचा त्रिफळा उडाला.
काही क्षण एलिसा व शिखा यांच्यासह दोन्ही संघातील खेळाडू, पंच तसेच चाहत्यांनाही काय झाले ते उमगले नाही. शिखाने टाकलेल्या या चेंडूला सोशल मीडियावर बॉल ऑफ द सेंच्युरी आणि बॉल ऑफ द इअर असेही संबोधले जाऊ लागले आहे.