दिल्ली –भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू व उद्योन्मुख खेळाडू लक्ष्य सेन यांनी येथे सुरू असलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
महिलांच्या एकेरीत सिंधूने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आपलीच देशभगिनी अश्मिता छलिया हिच्यावर 21-7, 21-18 असा केवळ 36 मिनिटांत विजय मिळवला.
लक्ष्य सेन याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात एच. एस. प्रणोय याच्यावर 14-21, 21-9, 21-14 अशी मात केली.
आता उपांत्य फेरीत सिंधूची लढत थायलंडच्या सुपानिदा कातेथॉंगशी होणार आहे. सेनचा सामना मलेशियाच्या एनत्झे यॉंग व आयर्लंडच्या हॅत न्गुयान यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.