नागपूर – ऑस्ट्रेलियाविरुद्धचा नवोदित फिरकी गोलंदाज टॉड मर्फि याच्या गोलंदाजीवर भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहता आता त्याची फिरकी गोलंदाजी खेळताना तारांबळ उडत असल्याचे समोर येत आहे. कोहली खऱेतर त्याच्या डेड-डीफेन्सबाबत ओळखला जातो मात्र, गेल्या दोन तीन वर्षांत त्याला फिरकी गोलंदाजी खेळताना सातत्याने अपयश येत असल्याचे दिसत आहे.
2021 सालापासून कोहली 16 डावांत 12 वेळा फिरकी गोलंदाजांच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. त्यात सहा वेळा ऑफस्पीन तर सहा वेळा लेग स्पीन गोलंदाजांनी बाद केले आहे. तसेच इंग्लंडचा मोईन अली, दक्षिण आफ्रिकेचा इमरान ताहीर व ऑस्ट्रेलियाचा नाथन लियॉन यांनी कोहलीला सातत्याने बाद केले आहे. आता नवोदित मर्फिने त्याला बाद करत या यादीत आपलेही नाव नोंदवले. मात्र, त्याचवेळी कोहलीचे फिरकी गोलंदाजी खेळण्याचे तंत्रच लोप पावल्याचे समालोचकांनीही म्हटले आहे.
ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तान संघाविरुद्ध सामने म्हटले की, विराट कोहलीचा आक्रमक पवित्र आपल्याला पाहायला मिळतो. या दोन्ही देशांच्या विरुद्ध खेळताना अनेकवेळा त्याने मोठ्या खेळी साकारलेल्या आहेत. त्यामुळे यंदाची बॉर्डर गावस्कर ट्रॉफीही विराट कोहली नकीच गावाजणार असे सर्वांनाच वाटत आहे. मात्र, तो पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात अपयशी ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा नवोदित गोलंदाज टॉड मर्फि याच्या फिरकीचा सामना करताना विराट कोहली चाचपडताना दिसला. त्यामुळे तो सामन्याच्या पहिल्या डावात अवघ्या १२ धावांवरच बाद झाला. विराटला फिरकी खेळण्यात येत असलेल्या अडचणी मागील काळापासून सर्वांनीच पहिल्या आहेत. त्यामुळे आता तो फिरकी गोलंदाजी खेळायची विसरलाय का असा सवाल निर्माण झालाय.