लायसन्स कोट्यात वाढ

पुणे – पक्‍क्‍या वाहनाचा परवाना काढण्यासाठी वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी नागरिकांना पूर्वनियोजित तारीख आणि वेळ मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने लायसन्सच्या कोट्यामध्ये वाढ केली आहे.

दि. 21 ऑगस्टपासून दुचाकी वर्गाच्या पक्‍क्‍या लायसन्सचा कोटा 100 ने आणि हलके मोटार वाहन वर्गाच्या पक्‍क्‍या लायसन्सचा कोटा 100 ने वाढविण्यात आला आहे. या कोट्यामुळे नागरिकांना “अपॉईंटमेंट’ घेण्यासाठी थांबावे लागणार नाही. यामुळे नागरिकांचा वेळ आणि त्रास वाचणार आहे. ज्या उमेदवारांनी शुल्क भरले आहे, अशा उमेदवारांना पूर्वनियोजित तारीख आणि वेळ घेता येणार आहे. याकरिता “परिवहन.जीओव्ही.इन’ या संकेतस्थळावर जाऊन “डीएल स्लॉट बुकींग’ आणि “अपॉईंटमेंट टू आरटीओ’ ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्‍यक आहे. अर्ज पूर्ण केल्यानंतर दुचाकी वाहन चाचणीसाठी फुलेनगर येथे, तर हलक्‍या मोटार वाहन चाचणीसाठी भोसरी येथील आयडीटीआर येथे चाचणीसाठी हजर रहावे, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.