पावसामुळे नदी, ओढे तुडुंब : पिके तरारली
कुरवली- इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील कुरवली सह तावशी,उद्घट,जांब,चिखली,मानकरवाडी या परिसरात परतीच्या पाऊसाने बळीराजाला दिलासा दिला आहे. मंगळवार दि 24 रोजी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सध्या तग धरून असलेली पिके पावसामुळे तरारली आहेत.
बारामती, कळंब, बावडा, नरसिंहपूर रस्त्यावरील तावशी व चिखली ओढ्याना पाणी आले आहे. ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. खरीप पिके व उस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी पावसाची 53 मिमी नोंद झाली आहे. आजअखेर 323 मिमी नोंद झाली आहे. कऱ्हा नदीला आलेल्या पुरामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. तावशी व चिखली येथील ओढ्यावरून पाणी वाहत आहे. नीरेवरील तावशी, जांब, कुरवली, चिखली बंधारे पाण्याखाली गेले आहेत.