‘या’ राज्यात अंतिम वर्षाची परीक्षा वगळता सर्व परीक्षा रद्द

बेंगळूर: करोनाचा प्रार्दुभावाच्या पार्श्‍वभूमीवर पदवी शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता सर्व महाविद्यालयीन परीक्षा रद्द केल्याची घोषणा कर्नाटकचे उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री अश्वत्थ नारायण यांनी केली आहे. यामुळे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा पदवीच्या केवळ अंतिम वर्षाची परीक्षा होणार आहे. बाकी सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून त्यांनी नवीन वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचे मंत्री अश्वत्थ नारायण यांनी स्पष्ट केले. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे.

कमी गुण मिळाले असतील ऐच्छिक परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. हा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार घेण्यात आला असल्याचे अश्वत्थ नारायण यांनी सांगितले.राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा जरी होणार असल्यातरी करोना संदर्भातील गांभीर्य वाढल्यास बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.