खडकवासला -गेली दोन-तीन वर्षे करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे होळी, धूलिवंदनाचे सण साधेपणानेच साजरा झाले होते. यंदा करोनास्थिती आटोक्यात आल्याने होळी, धूलिवंदनाचा उत्साह दिसून आला.
बाजारातही धूलिवंदन, होळीनिमित्त रंग, पिचकाऱ्यांनी दुकाने सजली होती. होळीच्या पूर्वसंध्येला रंग, पिचकाऱ्यांची खरेदी अनेकांनी केली. यावर्षी पश्चिम हवेलीमध्ये मोठ्या उत्साहात होळी, धूलिवंदन हा सण साजरा करण्यात आला.
यंदा पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग वापरण्याकडे नागरिकांचा ओढा दिसून येत आहे. धूलिवंदनाला पाण्याची नासाडी टाळण्यासाठी कोरडा रंग वापरण्याचा निर्धारही अनेकांनी केला. होळी, धूलिवंदनाचा सण हा निसर्ग, पर्यावरणाशी संबंधित आहे.
त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संकल्प यानिमित्त करण्यात आला. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेतली. आनंदमय वातावरणात सण साजरा केला.”परतूर’ होळी तथा धूलिवंदनाचा सण पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्यात आला.
रासायनिक घटकापासून बनवलेले रंग विषारी व घातक असताना. त्यामुळे धूलिवंदन साजरा करताना नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला, सण साजरा करताना निसर्गाला हानी पोचणार नाही याचीही काळजी घेण्यात आली, असे सुप्रिया माने हिने सांगितले.