मुंबई – बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी बऱ्याच दिवसांपासून डेटिंग करत आहेत. ‘शेरशाह’ रिलीज झाल्यापासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराच्या जोडीबाबत त्यांचे फॅन्स खूपच एक्साईटेड आहेत. ‘शेरशाह’मध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कारगिल युद्धातील हिरो कॅप्टन विजय बत्रा यांचा रोल केला होता.
तर कियारा आडवाणी विक्रम बत्रा यांची गर्लफ्रेंड ‘डिंपल चीमा’च्या रोलमध्ये दिसली होती. आता सिद्धार्थ आणि कियारा या दोघांच्या लग्नाच्या प्लॅनची घोषणा झाली असून, लवकरच हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 6 फेब्रुवारीला कियारा आणि सिद्धार्थ यांचे लग्न राजस्थानमध्ये असून सध्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.
अत्यंत राॅयल पध्दतीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. 100 ते 150 अत्यंत जवळच्या लोकांमध्ये हा विवाह सोहळा पार पडेल. कियारा आणि सिद्धार्थ जैसलमेरला विवाहस्थळी दाखल झाले आहेत. सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा होणार आहे. मात्र, विवाह सोहळ्यासाठी पॅलेसमधील स्टाफसह पाहुणे मंडळींना काही नियम हे फाॅलो करावे लागणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, या शाही विवाह सोहळ्यामध्ये नो फोन पॉलिसी असणार आहे. या विवाह सोहळ्यामध्ये फोटो किंवा व्हिडीओ काढता येणार नाहीत. नो फोन पॉलिसी सर्वांनी फाॅलो करावी, तसेच फोटो किंवा व्हिडीओही शेअर नाही करायचे, अशी विनंती सिद्धार्थ आणि कियाराकडून करण्यात आलीये. या सर्व नियमांचे पाहुण्यांना करावे लागणार आहे.
दरम्यान, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील फेमस लव्ह बर्ड्स मानले जाते. दोघांना अनेकदा पार्टी आणि कॅफेमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवताना कॅमेऱ्यात टिपण्यात आले आहे. गेल्या काही काळापासून दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू असून दोघेही आता लग्नबंधणात अडकणार आहेत.