दुबई – सौदी अरेबियामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलेल्या तब्बल 81 जणांना शनिवारी एकाच दिवशी फाशी देण्यात आले. फाशी देण्यात आलेल्यांमध्ये हत्येच्या आरोपात दोषी आढळलेले आणि दहशतवादाशी संबंधित असलेल्यांचाही समावेश होता.
सौदी अरेबियामध्ये अलिकडच्या काळात सामूहिक फाशी देण्याचा प्रकार घडला नव्हता. राजघराण्याकडून त्या सामूहिक देहदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे संपूण4 जगात आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले आहे.
यापूर्वी जानेवारी 1980 मधअये सौदी अरेबियात अशाप्रकारे सामूहिक फाशी देण्यात आली होती. मक्केतील मशिदीचा ताबा घेण्याच्या प्रकरणात दोषी ठरवल्या गेलेल्या 63 जणांचा तेंव्हा सामूहिक शिरच्छेद करण्यात आला होता. त्यापेक्षाही काल सामूहिक देहदंड देण्यात आलेल्या दोषींची संख्या अधिक होती. सौदीतील सरकारी वृत्तसंस्थेने या सामूहिक देहदंडाच्या शिक्षेची माहिती दिली आहे. शिक्षा दिलेल्यांपैकी काही जण अल कायदा, इस्लामिक स्टेटचे सदस्य होते तर काही जण येमेनमधील हौथी बंडखोर गटाचे सदस्य होते, असेही या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
या शिक्षेच्या अंमलबजावणीपूर्वी दोषींना वकिल देण्यात आला होता. तसेच सौदीतील कायज्यानुसार त्यांच्या हक्कांचे रक्षणही केले गेले होते. या सर्वांना नागरिक आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवले गेले होते. असे सौदी प्रेस एजन्सीने म्हटले आहे.
दहशतवाद आणि कट्टरवादाविरोधात सौदीचे राजघराणे यापुढेही अशाच प्रकारे ठाम आणि कठोर भूमिका घेणार असल्याचेही या वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.
2016 च्या जानेवारी महिन्यात अशाच प्रकारे सामूहिक देहदंडाच्या शिक्षेमध्ये 47 जणांना देहदंड देण्यात आला होता. त्यामुधअये राजघराण्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शिया धर्मगुरूचागी समावेश होता. तर 2017 मध्ये 37 जणांना सामूहिक फाशी दिली गेली होती. त्यात शिया धर्मगुरूंबरोबर दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यात दोषी आढळलेल्यांचाही समावेश होता.