बंगळुरूत कॉंग्रेस आमदाराच्या घराबाहेर स्फोट, एकाचा मृत्यू

बंगळुरू – बंगळुरूमधील कॉंग्रेस आमदाराच्या घराबाहेर रविवारी सकाळी झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे. स्फोट घडवला? की नेमका स्फोट कशाचा झाला याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे.

व्यंकटेश असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसारी, आमदार मुनीरथना यांचे राजेश्वरी नगर येथील घराजवळ रविवारी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी जवळून जाणाऱ्या एका व्यक्तीचा यात मृत्यू झाला आहे. या स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी घटनास्थळी पोलिसांना एक निळ्या रंगाची प्लॉस्टिकची बॅग आढळून आली आहे. तसेच श्‍वान पथकाकडूनही तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस आयुक्‍त टी सुनिलकुमार यांनी दिली. हा स्फोट कशामुळे झाला हे फोरेंसिक रिपोर्ट मिळाल्यानंतरच समजू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here