कर्नाटकातील नेत्यांना राहुल गांधींकडून कानपिचक्‍या

नवी दिल्ली – कर्नाटकमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलाबरोबरच्या ताणलेल्या संबंधांच्या पार्श्‍वभुमीवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांना कानपिचक्‍या दिल्या आहेत. आघाडी धोक्‍यात आणण्याचे वर्तन सहन केले जाणार नाही, अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी भेटायला आलेल्या कॉंग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाला सुनावले आहे, असे प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश गुंडुराव यांनी सांगितले.

राहुल गांधी यांच्याबरोबरच्या या बैठकीमध्ये कॉंग्रेस नेत्यांनी आघाडी सरकारविरोधातील अपली सामूहिक मते मांडली. मात्र राहुल गांधी यांनी त्यांचे मत मान्य केले नाही. लोकसभा निवडणूका सुरू असल्यामुळे कोणाही पदाधिकाऱ्याविरोधात कारवाई केली गेली नाही. मात्र भविष्यात अशाप्रकारची कृती सहन केली जाणार नाही, असे पक्षाच्या हायकमांडने स्पष्ट केले आहे. या शिष्टमंडळामध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि माजी मंत्री डी.के.शिवकुमार यांचाही समावेश होता. राज्यातील नेत्यांमधील असंतोष मिटवण्यासाठी लवकरच समन्वय समितीची बैठक लवकरच बोलावली जाणार आहे.

लोकसभा निवडणूकांच निकाल लागल्यानंतर कर्नाटकमध्ये सत्ताबदल होऊ शकतो, असे वक्‍तव्य सिद्धरामय्या यांच्या समर्थकांकडून व्यक्‍त केले जात होते. त्यावर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीही राजीनामा देऊन आघाडी मोडण्याची तयारी दर्शवली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.