नवी दिल्ली – दिल्लीतील शाळांनी २०२३ मध्ये अनेक महत्वाचे टप्पे पार करीत कमाल केली आहे. या विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये ३२ जागा मिळवल्या आणि “बिझनेस ब्लास्टर्स इन्व्हेस्टमेंट एक्स्पो” मध्ये १०० हून अधिक स्टार्टअप्स सादर करून या विद्यार्थ्यांनी गुंतवणूकदारांना व्यवसाय कल्पना सादर केल्या.
२०२३ मध्ये दिल्ली सरकारद्वारे चालवल्या जाणार्या शाळांनी अनेक बाबतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, दिल्लीच्या शाळांमध्ये हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील १५०हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि त्यांना सामान्य जीवन जगण्यास मदत करण्यासाठी प्रयत्न केले गेले. दिल्ली सरकारतर्फे शहीद भगतसिंग आर्म्ड फोर्सेस प्रीपरेटरी स्कूल चालवले जाते.
या शाळेतील तब्बल ३२ जणांनी एनडीएची परिक्षा उत्तीर्ण केली. त्यात नऊ मुली आहेत. या शाळेत एकूण २३७ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत आणि इयत्ता 12 मधील ७६ विद्यार्थी एनडीए परीक्षेस बसले होते.त्यातील तब्बल ३२ विद्यार्थ्यांनी एनडीएत प्रवेश मिळवला. आम आदमी पार्टी सरकारने गेल्या वर्षी स्थापन केलेली ही शाळा, विद्यार्थ्यांना सशस्त्र सेना अधिकारी म्हणून तयार करण्यासाठी प्रशिक्षण देते आणि विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करते.
या व्यतिरिक्त, शहरातील सरकारी शाळांच्या “बिझनेस ब्लास्टर्स” कार्यक्रमाने एप्रिलमध्ये एक उल्लेखनीय टप्पा गाठला, जेव्हा दिल्लीचे मंत्री आतिशी यांनी जाहीर केले की प्रकल्पाच्या गुंतवणूक प्रदर्शनासाठी निवडलेले विद्यार्थी शीर्ष विद्यापीठांमध्ये थेट प्रवेशासाठी पात्र असतील.या वर्षी दिल्ली सरकारच्या बिझनेस ब्लास्टर्स इन्व्हेस्टमेंट समिट आणि एक्सपोमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे सुमारे १०० स्टार्टअप्स निवडले गेले आहेत.
या प्रकल्पाविषयी बोलताना दिल्ली पालक संघटनेच्या अध्यक्षा अपराजिता गौतम म्हणाल्या की, शहर सरकारच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि महत्त्वाकांक्षांना आकार मिळू लागला आहे.सर्व विद्यार्थी कल्पनांनी परिपूर्ण आहेत परंतु त्यांना प्रोत्साहन किंवा समर्थन देणारे फारच कमी आहेत. बिझनेस ब्लास्टर्स हा एक प्रकल्प आहे जिथे दिल्लीतील सरकारच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि महत्त्वाकांक्षांना आकार मिळू लागला आहे असे त्या म्हणाल्या.