आजारपणामुळे झाला जागतिक विक्रम; सात फूट उंच रुमैसा ठरली जगातील सर्वात उंच महिला

हंकारा : तुर्कस्तानमधील रुमैसा ही सात फूट उंचीची महिला जगातील सर्वात उंच महिला ठरली असून तिच्या या जागतिक विक्रमाला तिचे एक आजारपण कारणीभूत ठरले आहे.  24 वर्षे रुमाईसाची उंची सात फूट एक सेंटीमीटर आहे.

विवर सिन्ड्रोम नावाच्या आजाराने ती ग्रस्त असून या आजारात उंची अनियंत्रित पद्धतीने वाढत जाते. पण ज्या प्रमाणात उंची वाढत जाते त्या प्रमाणात हाडांना बळकटी मिळत नसल्याने रुमैसा कमकुवत असून तिला हालचालींसाठी व्हीलचेअरचा सहारा घ्यावा लागत आहे.  या आजारामुळे तिची उंची सात फुटापर्यंत वाढली आणि 2014 मध्ये जगातील सर्वात उंच टिन एजर म्हणून तिची नोंद करण्यात आली.

नुकतीच पुन्हा एकदा तिची उंची मोजण्यात आली आणि सर्वात उंच महिला म्हणून तिचे नाव नोंदवण्यात आले. यापूर्वी जगातील सर्वात उंच महिला असण्याचा विक्रम चीनमधील चेंज जीलियन या महिलेच्या नावावर होता. तिची उंची तब्बत आठ फूट एक इंच होती पण 1982 मध्ये तिचा मृत्यू झाला आता जगातील सर्वात उंच महिला म्हणून रुमैसाचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आला आहे.

ज्या आजारपणामुळे तिला हा विक्रम करता आला, त्या आजारात म्हणजेच विवर सिंड्रोम या आजारात लहानपणापासूनच अनियमित पद्धतीने उंची वाढत जाते. 2012 मध्ये रुमाईसाला आपल्या या आजाराची जाणीव झाली. त्यानंतर तिच्या हालचालीचा नियंत्रण आले असल्याने ती व्हीलचेअर वरच वावरते पण शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी ती पोहण्याचा व्यायाम ही करते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.