पाचगणी – महाबळेश्वर तालुक्यात बेकायदा बाधकामांचा सुळसुळाट झाला असून, त्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. त्यानुसार, मेटगुताड येथील “सांभाला’ रिसॉर्ट तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी पोलीस बंदोबस्तात गुरुवारी सील केले.
बेकायदा बांधकाम केल्याने सांभाला रिसॉर्ट तहसीलदार सुषमा पाटील, ग्रामविकास, महावितरण कंपनी यांच्या संयुक्त पथकाने सील केले. सांभाला रिसॉर्टचे बेकायदा बांधकाम मालकाने स्वखर्चाने, एक महिन्यात पाडावे, असा आदेश महसूल विभागाने दिला होता.
हा आदेश रिसॉर्ट मालकाने धुडकावून लावल्याने अखेर रिसॉर्ट सील करण्यात आले. रिसॉर्टचा विद्युत व पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यावेळी नायब तहसीलदार पारवे, तलाठी शेडुळकर, मंडलाधिकारी खटावकर, मेटगुताड ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.