नवी दिल्ली – भारतात गेल्या काही दिवसात फुटबॉलमधील प्रगतीसाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे भारतीय संघ फीफा विश्वकरंडक स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. तर दुसरीकडे, भारतातील फुटबॉलपटूंना व्यासपीठ देण्याचे मोठे काम सुरु आहे. इंडिया खेलो फुटबॉलच्या माध्यमातून ५० पेक्षा जास्त शहरे आणि गावांमध्ये नवोदीत गुणवत्तेचा शोध घेण्यात येत आहे. यातून निवडलेल्या खेळाडूंच्या माध्यमातून फुटबॉल क्लब आणि अकादमींना आकर्षित करण्याचा उद्देश आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून भारत आणि अमिरातीतील शहरे आणि गावांमध्ये फुटबॉलसाठी चाचणी घेण्यात आल्या. त्यानंतर आता इंडिया फुटबॉल खेलो सिझन ३ साठी (IKF Season 3) काही निवडक खेळाडू सज्ज झाले आहेत. अहमदाबाद येथील इका अरेना येथे ब्लॉकबस्टर ग्रँड फिनाले होणार आहे. या स्पर्धेशाठी १३ ते १७ वयोगटातील १५० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
इंडिया फुटबॉल खेलो या उपक्रमाची २०२० साली स्थापना झाली असून फुटबॉल आणि व्यवसायिक फुटबॉल यातील अंतर कमी करण्याचा यामागे उद्देश आहे. या माध्यमातून फुटबॉलपटूंना भारतीय क्लब (आयएसएल आणि आय लीग), तसेच आंतरराष्ट्रीय अकादमीसाठीचा मार्ग मोठा होणार आहे. फुटबॉलच्या या मोहिमेत आतापर्यंत १० हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
जमशेदपूर एफसी, केरळ ब्लास्टर्स, गोवा एफसी, मुंबई सिटी एफसी आणि चेन्नईयिन एफसी हे इंडियन सुपर लीग क्लब खेळाडूंची निवड व चाचणी घेणार आहे. तर, आय लीग क्लब गोकुलम केरळ, दिल्ली एफसी, बडोदा एफए, एआरए, महाराष्ट्र ऑरेंज एफसी आणि युनायटेड एससी कोलकाता यांचीही खेळाडूंची शोध मोहिम घोणार आहे. एफसी मद्रास, झीन्का एफसी, अल्फा स्पोर्ट्स अकादमी, अर्डर एफए, विशाल बिहार युनायटेड, स्पोर्टो आणि नॉर्दर्न युनायटेड यांसारख्या देशातील काही आघाडीच्या अकादमी या स्पर्धेत सहभागी होतील. देशातील नवोदित फुटबॉलपटूंना भारतीय फुटबॉलच्या मोठ्या दिग्गजांसमोर त्यांची प्रतिभा दाखवण्याची सुवर्ण संधी आहे. इंडिया खेलो फुटबॉल हे त्यासाठी एक माध्यम ठरणार आहे. आता आपली चमक दाखवणाऱ्या खेळाडूंना भविष्यात चांगली संधी मिळणार आहे.