तुम्ही EPFO खातेधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) 30 नोव्हेंबरपर्यंत आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. अन्यथा, तुम्हाला पीएफ खात्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तुम्ही तुमचा UAN नंबर आजपर्यंत आधार कार्डशी लिंक केला नसेल, तर लवकरात लवकर करा.
* पीएफचे पैसे थांबू शकतात
तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत EPFO आणि आधार क्रमांक लिंक न केल्यास, तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारे योगदान थांबवले जाऊ शकते. याशिवाय, तुम्हाला तुमच्या EPF खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात. याशिवाय, जर तुम्ही आधार आणि UAN लिंक केले नाही तर तुम्ही EPFO च्या सेवा वापरू शकणार नाही.
* काय आहे UAN क्रमांक ?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये नोंदणीकृत होताच, कर्मचारी या संस्थेचा सदस्य बनतो आणि त्याला 12 अंकी क्रमांक प्रदान केला जातो, ज्याला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN नंबर) म्हणतात. या क्रमांकावरून वापरकर्ता ईपीएफओच्या ऑनलाइन सेवांचा वापर करून त्याच्या खात्याशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतो.
* UAN ला आधारशी कसे लिंक करावे
. EPFO पोर्टलला भेट द्या https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/.
. लॉगिन करण्यासाठी तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाका.
. आता मॅनेज सेक्शनमधील केवायसी पर्यायावर क्लिक करा.
. यानंतर ईपीएफ खात्याशी जोडलेली कागदपत्रे दिसतील.
. येथे आधार पर्याय निवडा आणि आधार क्रमांक टाका.
. नाव भरताना फक्त आधार कार्डवर टाकलेले नाव भरा.
. सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह ऑप्शनवर क्लिक करा.
. असे केल्याने तुम्ही टाकलेली माहिती सर्व्हरमध्ये सेव्ह होईल.
. यानंतर तुमचा आधार UIDAI च्या डेटाने पडताळला जाईल.
. तुमची केवायसी कागदपत्रे बरोबर असल्यास आधार तुमच्या पीएफ खात्याशी लिंक केला जाईल.
. तपासल्यानंतर तुम्हाला आधारच्या समोर Verify लिहिलेले दिसेल.
. म्हणजे तुमचा आधार आणि UAN क्रमांक यशस्वीरित्या लिंक झाला आहे.